Site icon Active Guruji

5 Jully | 5 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

5 Jully

5 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– बुधवार

दिनांक- 05/07/2023, 5 Jully

मिती- आषाढ कृ.2

शके– 1945

सुविचार- एक स्मित जग बदलू शकते आणि ते अधिक उजळ करू शकते.

म्हणी व अर्थ – रात्र थोडी सोंगे फार – कामे पुष्कळ, पण ती पार पाडायला वेळ न पुरणे.

वाक्प्रचार- वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते.
बातम्या-
ठाण्यात प्रलंबित मागण्यांसह जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पुणे – अजित पवारांसोबत गेलेली ३ माणसे संशयास्पद वाटतात, त्यामुळे हे शरद पवारांच्या संमतीनेच घडल्याचं वाटतं – राज ठाकरे
मुंबई – अजित पवारांना ४० राष्ट्रवादीचे आणि ३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा, अमोल मिटकरी यांची माहिती
कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बसस्थानकांचे रूपडे पालटणार, एसटीच्या दत्तक योजनेस सुरुवात
रत्नागिरीतील जगबुडी नदी धोका पातळीपर्यंत, नागरिकांमध्ये चिंता
दर्शना पवार खून प्रकरण: राहुल हांडोरेची रवानगी येरवडा कारागृहात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर; नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार.

ठळक घटना आणि घडामोडी

5 जुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८६ वा किंवा लीप वर्षात १८७ वा दिवस असतो.

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

वंदन देवीला
वंदन देवीला करु या ।
देवी सरस्वती सुंदर मूर्ती । आपण पाहू या ॥ ध्रु.।।
शुभ्र साडीचा पदर जरीचा ।
मुगुट शोभतो नवरत्नांचा ।
मोराजवळी बसते हाती । वीणा घेउनिया ।। १ ।।
शुभ्र फुलांची माळ शोभते । लाल चुटुक ते कुंकुही दिसते।
काळे कुरळे केस मोकळे । पाठीवरती या ।। २ ॥
देवी बल द्या, धैर्यही आता ।
देशावरती शत्रू येता,
ठार करुया त्या दुष्टाना, शक्ति आम्हाला द्या ।। ३ ।।
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

बैल आणि बेडूक 
एके दिवशी बेडकाची मुलं खेळता-खेळता तलावाच्या बाहेर गेले. ते तलावाच्या नजीकच्या गावात जाऊन पोहोचले त्यांनी तिथे एक बैलाला बघितले. त्या बैलाला बघतातच त्यांना खूप आश्चर्य झाले.
या पूर्वी त्यांनी एवढे मोठे प्राणी बघितले नव्हते. त्या बैलाला बघून ते फार घाबरले. ते आश्चर्याने त्या बैलाला बघत होते तो आरामात गवत खात होता. गवत खाताना त्या बैलाने जोरात आवाज काढला.
बेडकाची मुलं घाबरून तिथून पळाली आणि तलावात येऊन लपून बसली. त्यांना घाबरलेले बघून त्यांच्या वडिलांनी घाबरण्याचे कारण विचारले.
तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले आणि त्यांनी इतका मोठा प्राणी बघितला असे सांगत होते. त्यांना वाटत होते की तो बैलच खूप ताकतवर आहे आणि असं त्यांनी बोलून देखील दाखवले. हे ऐकतातच बेडकाचे अहंकार दुखावले गेले .
त्याने गर्वाने छाती फुगवून आपल्या मुलांना विचारले की “एवढा मोठा प्राणी होता का तो ?” त्याच्या मुलाने म्हटले की ” हो तो तुमच्या पेक्षा अधिक मोठा प्राणी होता. “
आता मात्र बेडकाला राग आला आणि त्याने अधिक छाती फुगवून विचारले ” की एवढा मोठा होता का तो प्राणी ? ” मुलांनी सांगितले की, हे तर काहीच नाही या पेक्षा देखील मोठा होता तो.”
असं ऐकल्यावर त्याने अजून स्वतःला फुगवायला सुरू केले असं करता करता अचानक त्याचे शरीर फुग्यारखे फाटले आणि त्याला खोट्या गर्वामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले.
तात्पर्य – कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. गर्व केल्याने स्वतःचे नुकसान होतात.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
 ~प्रेम धवन

बालगीत

पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।
इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।
आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।
पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) गाई म्हशींच्या शेणापासून कोणता ज्वलनशील वायू तयार होतो ?
उत्तर : गोबरगॅस
२) शेळ्या व मेंढ्यापासून कोणते खत
मिळते?
उत्तर : लेंडीखत
३) गाई म्हशीपासून कोणते खत मिळते?
उत्तर: शेणखत
४) गोव-यांचा वापर कशासाठी होतो?
उत्तर: इंधन
५) मातीची घरे लिंपण्यासाठी कशाचा
वापर होतो ?
उत्तर : शेणाचा

ENGLISH QUESTION

1) What is the colour of a sunflower?
Ans : Yellow
2) What is the colour of blood in a human body?
Ans : Red
3) What is the colour of a leaf in a plant?
Ans : Green
4) What colour is the Crow ?
Ans : Black
5) Which color is at the top of the Indian national flag?
Ans: Saffron

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#5 jully, 5 jully 2023, 5 jully 2021 panchang, 5 jully 2022 special day, 5 jully 2023 weather, 5 jully 2022 panchang in hindi, 5 jully is celebrated as, what is celebrated on 5 jully, 5 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Exit mobile version