Site icon Active Guruji

ssc board exam result 2024 | 10वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा निकाल

ssc board exam result 2024

10वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा निकाल, 27 मे रोजी जाहीर होणार

SSC RESULT, दहावीचा निकाल, SSC NIKAL

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४ यांच्या वतीने घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल जाहीर …

मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर
सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते –

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
तसेच
https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८/०५/२०२४ ते मंगळवार, दिनांक ११/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल,
त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

SSC NIKAL UPDATES-

२) मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्यर्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
३) मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक ३१/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत.
त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
दिनांक:- २५/०५/२०२४
अनुराधा ओक
सचिव, राज्य मंडळ, पुणे-०४.

Tags-

results.gov.in 2024,
maharesult.nic.in 2024 hsc result,
Ssc result 2024 maharashtra board 10th date and time,
Https results gov in https mahresult nic in,
Mahresult nic in 2024 ssc result time,
Mahresult nic in 2024 time,
SSC Result 2024 Maharashtra Board link

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..


@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

DECLAIMER-

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Exit mobile version