23.परिवर्तन विचारांचे | 6वी ,मराठी

23.परिवर्तन विचारांचे

प्रश्न १. चार ते पाच वाक्यांत उत्तरे लिहा :

१) अजय अस्वस्थ का झाला?

उत्तर : सहलीच्या दिवशी सकाळी तो सहलीची तयारी करीत असताना पाल चुकचुकली. घराबाहेर पडताना
मांजर आडवे गेले. बसचा टायर पंक्यर झाला. मित्राचा पाय मुरगळला. आई म्हणते त्याप्रमाणे अपशकुन झाल्यामुळे
या घटना घडल्या तर नसतील असा विचार अजयच्या मनात आला. त्यामुळे तो अस्वस्थ झाला.

२) कोणताही वार हा वाईट नसतो, हे सरांनी अजयला कसे पटवून दिले?
उत्तर : सरांनी अजयला पटवून दिले की, विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. खुळचट व बिनबुडाच्या कल्पना
धरून बसू नये, अशास्त्रीय विचार करू नये. पाल खाताना आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे
फिरणारच. अणकुचीदार वस्तू रुतल्यामुळे टायर पंक्चर होतो. अपशकुन वगैरे काहीही नसते. तसेच कोणताही वार वाईट नसतो.

३) कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे, असे सर म्हणतात?
उत्तर : सर अजयला म्हणाले की, सगळे वार चांगलेच असतात. ज्या दिवशी आपण वाईट काम करू,
दुसर्याला त्रास होईल असे वागू किंवा दुसऱ्याची मने दुखवू तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे. ज्या दिवशी आपण
वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे, असे सर म्हणतात.

प्रश्न-अजयचे मत परिवर्तन कसे झाले, ते तुझ्या भाषेत मांड.

उत्तर : सहलीच्या दिवशी सकाळी आवरताना अजयच्या भिंतीवरची पाल चुकचुकली. अजय बाहेर पडताना
माजर आडवे गेले. आईच्या मताप्रमाणे हे अपशकन झाले, असे अजयला वाटले. तो नाराज झाला. तशातच बस पंक्चर
झाला वे बसमधून उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला. अपशकुन झाल्यामुळेच हे प्रसंग घडले असावेत, असे
अजयला वाटले. या विचाराने तो अस्वस्थ होता. आपल्या मनातली शंका त्याने सरांना बोलून दाखवली. संध्याकाळी
परतल्यावर सरांनी त्याला समजावले की अपशकुन वगैरे काही नसते. अशास्त्रीय व निरर्थक विचार करू नये. कुठलाही
वार वाईट नसतो. जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा. अजयला सरांचे म्हणणे पटले. अजयचे मत
परिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला.

प्रश्न- कोण, कोणास व का म्हणाले ते सांगा :

१) ‘आपली सहल नीट पार पडेल ना?’
उत्तर : असे अजय सरांना म्हणाला; कारण अपशकुनांमुळे बस पंक्चर झाली आणि मित्राचा पाय मुरगळला,अशी शंका अजयच्या मनात आली होती.

२) ‘तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस.’
उत्तर : असे सर अजयला म्हणाले; कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना करायचे होते.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.