Mayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी

Mayechi Pakhar

कर्मवीर भाऊराव पाटील – मायेची पाखर ,इयत्ता चौथी –स्वाध्याय

इयत्ता चौथी मराठी पाठ.६) मायेची पाखर-Mayechi Pakhar या पाठावरील आधारित टेस्ट व स्वाध्याय सोडवा.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. Mayechi Pakhar (मायेची पाखर) या पाठात भाऊरावांचे वस्तीगृहातील मुलांवर किती प्रेम होते या विषयीचा प्रसंग लेखकाने हृदयद्रावक शब्दात वर्णन केला आहे.कर्मवीर भाऊराव पाटील हे थोर शिक्षण महर्षी होते. Hence त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली.

खालील- १ते १० प्रश्नांची उत्तरे टेस्ट सोडवून मिळतील.
1.लेखक पुण्याला जाताना कोठे थांंबले?

2.भाऊरावांना सर्वजण काय म्हणत?

3.संस्थेच्या आवारात कशाचे झाड होते?

4.लेखकाला जेवणाचा आग्रह कोणी केला?

5.लेखकाला झोप का येत नव्हती?

6.लेखकाला जेवण कसे लागले?

7.डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

8.अण्णांनी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा काढल्या?

9.आता इथंच मुक्काम करा. असे लेखकाला कोण म्हणाले?

10.मायेची पाखरं / Mayechi pakha rह्या पाठाचे लेखक कोण?

दीर्घोत्तरी प्रश्न-

1.लेखक उपाशी आहे असे समजल्यावर अण्णांनी काय केले ?

उत्तर:- लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर त्यांनी एका मुलाला आज्ञा केली. ते म्हणाले- “जा रे, स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये.” मुलगा धावत स्वयंपाक घरात गेला आणि पिठले, भाकरी कांदा व तेल एका ताटात घेऊन आला.

2. मध्यरात्री नंतर कोणता प्रसंग घडला?

उत्तर :- कडाक्याची थंडी होती.मध्यरात्रीनंतर अण्णा उठले. कंदील हातात घेतला वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे पाहिले. त्यांनी त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे पाहिले.एक मुलगा थंडीने कुडकुडत होता. अण्णा त्याला दोन्ही हाताने अलगद उचलले स्वतःच्या बिछान्यावर आणून झोपवले. स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली. त्याला पोटाशी धरले तो मुलगा अण्णांच्या उबेत गाढ झोपी गेला.

3.सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले?

उत्तर :- थंडीने कुडकुडणाऱ्या मुलांनाअण्णांनी रात्री स्वतःच्या बिछान्यात आईच्या मायेने झोपवले हा प्रसंग लेखकाने त्याच्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले. लेखक म्हणाले ,”अण्णा ,आपण खरेखुरे या मुलाचे आईबाप आहात. या मुलाच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. “आपणास उदंड आयुष्य मिळो.”
for more educational info.Please visit – Active Guruji Blog

Author: Active Guruji

Blogger

7 thoughts

  1. खूप छान आहे. मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.