गुरुजींचे पालकांना पत्र | शाळा बंद पण शिक्षण सुरु

गुरुजींचे पालकांना पत्र

प्रिय पालक व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ बंधू भगिनी यांस,
तुमच्या मुलाच्या गुरुजींचा सप्रेम नमस्कार…

पत्र लिहिण्यास कारण की,

यंदा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुलं शाळेपासून आणि आमच्यापासून दूर झाली. एव्हाना मे महिन्याची सुट्टी व दिवाळीची सुट्टी म्हटलं की मुलांना पर्वणीच असायची.

स्वैरपणे व आनंदाने सगळी सुट्टी संपत आली की पुन्हा त्यांना शाळेची ओढ लागायची.

हे असंच काहीसं आमच्या- तुमच्या लहानपणापासून परंपरागत चालत आलेल्या चक्र.या कालचक्राला “कोरोना” नावाच्या महाभयंकर राक्षसाने खोडा घातला.

सबंध जगभरातील क्षणाक्षणावर स्वतःचे भीतीचे सावट लादले. त्याला कोणीच अपवाद राहिले नाही.मग त्याला ही कोवळी मनं तरी कसे अपवाद ठरणार?

Firstly त्यांच्या बालमनाला सुद्धा आजूबाजूचे ऐकून- पाहून अनेक प्रश्न पडत असणार हे निश्चितच. Secondly तुम्हालाही तुमच्या मुलाच्या भवितव्याची, शिक्षणाची चिंता वाटणे साहजिकच आहे.

म्हणूनच हे गुरुजींचे पालकांना पत्र – आपल्याशी बोलावं, मोकळं व्हावं असं वाटलं.

शिक्षणमंत्र्यांचा निर्णय –

however यंदाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सर्वच मुलांना पास झाल्याचे आणि पुढील वर्गात प्रवेश केल्याचं तुम्ही ऐकला असेल.

तरीही तुमचा पाल्य पुढच्या वर्गात जाण्यासाठी पात्र झाला आहे हे आम्ही कळवणे हे आमचे कर्तव्यच.Therefor त्यामुळे त्याच्या पास-नापास चिंता सोडून द्या. After that तो आता पुढच्या वर्गात जाणार, पण आता पुढे काय?

याबाबत आपण बोलूया…

खरं तर शाळा बंद म्हणजे शिक्षण बंद हा समज पहिला दूर करूया.

मुलं शाळेतच शिकतात असं नाही. घर, कुटुंब, समाज,परिसर यातूनही त्याचे शिक्षण होत असतं. त्याने जे घेतलेलं शिक्षण आहे त्या शिक्षणाला विधायक मार्गातून पुढे मार्गस्थ होण्यासाठी शाळा गुरुजन प्रयत्न करत असतात.

आज आम्ही त्यांच्या पासून दूर आहोत. सध्या चालू असलेला लॉक डाऊनमुळे संपर्क होणे शक्य नसलं तरी व्हाट्सअपच्या माध्यमातून मुलांच्या चाचण्या घ्या,स्वाध्याय घ्या असाही विचार पुढे आला आहे.

बऱ्याच ठिकाणी सुरू असेल यावर बोलत बसण्यापेक्षा आपण आपल्या मुलांच्या साठी काय करू शकतो?

होय, तुम्ही गुरुजी बना-

मुलाचे तुम्ही केवळ पालक नसून गुरुजी व्हा असंच काहीसं आव्हान मला आज करावसं वाटतं.

होय गुरुजी व्हा! आता गुरुजी म्हणजे लेखन, वाचन व  पाठांतर घ्या असंच नव्हे.

मुलांना मारून मुटकून अभ्यासाला बसवा यापलीकडेही आम्ही गुरुजीं मुलांना भरपूर काही देत असतो. त्यातलंच काहीसं  किंबहुना जास्त हे तुम्ही मुलांना देऊ शकता पण हे करताना मुद्दामून सांगावसं वाटतंय की त्यांच्यावर अभ्यासाचं ओझं लादू नका.

मग काय करता येईल?

8 मे नंतर मुलांची उन्हाळी सुट्टी सुरू झालेली आहे. ह्या  सुट्टीचा आनंद घेऊ द्या. त्यांना…. बागडू द्या. कुटुंबात लुडबुड करू द्या.त्यांना अटकाव करू नका… हटकू नका. अभ्यास, पाठांतराचा लकडा त्यांच्यामागे लावू नका.

आता तुम्ही म्हणाल “गुरुजी व्हा! म्हणताय ,अन अभ्यास करायचं सांगायचं नाही”. असं कसं गुरुजी?

मग काय करायचं?

मुलांच्या घरातल्या शिक्षणाची सुरुवात-गुरुजींचे पालकांना पत्र

 1.स्वच्छता आणि आपण

कामासाठी बाहेर जावं लागलं तर तोंडाला मास्क लावून जा.वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवा.इथूनच खर्‍या अर्थाने मुलांच्या घरातल्या शिक्षणाची सुरुवात करा.

तुम्ही आरोग्याचे मंत्र पाळले तर मुलेही त्याचा अनुकरण करतील हळूहळू तीही शिकतील.सकाळी उठल्यापासून सतत कामात असणारे तुम्ही, तुमचे कुटुंबीय….

तुम्हालाही या लॉकडाऊन मुळे थोडीशी उसंत मिळाली असेलच…. तेव्हा या वेळात मुलाकडे अधिक  लक्ष द्या. मुलांनाही घरातल्या छोट्या- छोट्या कामात गुंतवा. त्यांच्या शरीर स्वच्छतेकडे लक्ष द्या.

2.चांगल्या सवयी

स्वतःच्या गोष्टी स्वतःचं करण्याची सवय लावा. अधून मधून त्यांनाही सकाळी लवकर उठवा.पहाट कशी असते?  चिमणी पाखरांची स्वच्छंदी किलबिल त्यांना जाणीवपूर्वक ऐकवा…दाखवा त्याला सूर्याचे उगवणे.लालबुंद सूर्यबिंब…. पशु-पक्षांचे आवाज ऐकवा.तेही शिकतील पशु-पक्षांचे आवाज काढायला. नकला करायला.

भल्या पहाटे उठून राबणारी, गोठ्यातल्या शेणा मुतात हात घालणारी आई… हंबरणारी  वासरे… त्यांना मायेनं चाटणारी गाय…Similarly फेसाळणारं दूध कसं काढलं जातं? हेही त्याला बघू द्या.

घरातल्या छोट्या मोठ्या कामात त्यालाही सहभागी करून घ्या. हलकं फुलकं  काम आनंदाने करील तोही…..पण सक्ती नाही हं चालणार!

3.प्रत्यक्ष अनुभव

घरातली  स्वच्छता and जेवणाचं ताट स्वतःचे स्वतः धुवायला शिकवा. स्वतः पाणी घेऊन जेवायला बसायला शिकवा. पण ते तुमच्या कृतीतून.आईलाही भरपूर काम असतात. थोडंसं आपणही तिला मदत करून हलकं करूया.

भाकरीचं शेत त्यांनी पुस्तकात वाचलेय. For instance आता तुमच्या बरोबर त्याला आणखी शिकू द्या.

आता मिरगाची लगबग सुरू होईल so न्या त्यालासुद्धा शेताच्या बांधावर.

घराच्या कणगीत, तट्ट्यात, टोपल्यात येणारे भात, ज्वारी कसं येतं? ते पुन्हा पुन्हा बघू दे त्याला. उन्हाच्या झळा लागू द्या त्यालाही…. घामाच्या धारांनी  भिजुन चिंब होऊ दे त्यालाही. त्याशिवाय कष्टाची किंमत त्याला तरी कशी कळणार?

नुसती पुस्तकात वाचून? ‘पाऊस कसा पडतो?’ हे विचारा त्याला……. त्यानं पुस्तकात वाचलेलं, बघितलेलं, घ्या वदवून त्याच्याकडून…तुम्हीही शिकाल त्याच्याकडून बरंच ? तेव्हा तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल निश्चितच.पाटाच्या पाण्यात भिजू द्या त्याला.चिखल मातीचा स्पर्श होऊ द्या त्यालाही…

4.गरिबीची  जाण

बापाच्या अंगातील सदऱ्याला पडलेली भोकं येऊ देत त्याच्या नजरेत. रणरणत्या मातीच्या रावळावरून चालू द्या त्यालाही… त्याचे चटके त्याला आयुष्यभर श्रमाची किंमत करायला शिकवतील. दुपारी शिदोरीतील सुकलेली भाकरी आणि घोटभर पाण्याची चव त्यालाही चाखू दया.

विसरेल तो बाजारी मेव्याचा फिका स्वाद.त्यालाही रानमेवा, कैरीच्या आंबट-गोड फोडी, करवंद, जांभळं चाखू द्या…  तुमच्या बांधावर असतील तर बरं आणि नसतील तर तुम्हीही घ्या धडा शिकून आत्ताच….

5.परिसराशी नाते

बांधावरती एक तरी फळं झाड लावण्याचा निश्चय करायचा. पुढच्या पिढीला  तोही मोठेपणी सांगेल तो खेड्याची महती आणि मातीची किमया! सायंकाळी उसंत घ्या थोडीशी… मग बसा सगळेजण एकत्र गोळा होऊन… टीव्ही- मोबाईललाही द्या विश्रांती.

तुम्हीही या माणसात आणि त्यालाही येऊ द्या.सांगा त्यांना गमतीजमती तुमच्या शालेय जीवनातल्या and तुमच्या यशापयशाच्या. शिकेल त्यातूनही तो बरेच काही.

त्यालाही कळू द्या कमी-जास्त and ओळख करून द्या त्याला चवीची, रंगांची, लहान-मोठ्याची, मिठा-पिठाची,  आकारांची.कारण स्वयंपाक घर तर त्याच्या घरातली प्रयोगशाळाच आहे. दाखवा त्याला नानाविध घरातले प्रयोग. सहभागी करून घ्या त्यालाही.

त्याच्या उत्सुक नजरामध्ये तुम्ही कधी अडखळलाच तर आम्ही आहोतच की, प्रयत्न करू….

In addition त्यांच्या शंकेच्या निरसनासाठी एखादा कॉल केलात तर अनलिमिटेड कॉलिंग च्या युगात तेवढा तर लाभ होईल.आम्हालाही आनंद होईल त्याच्याशी बोलण्याचा…तुमच्याशी संवादाचा. झगमगाटाच्या, विजेच्या तारांगणातून थोडा वेळ बाजुला घ्या त्याला…

दाखवा त्याला काळेकुट्ट आभाळ and चमचम करणारे तारे, चंद्रकला, आकाश, दिशा यांचे  पुस्तकातील ओझे त्याचे होईल हळूहळू हलके.भूगोलाचे, विज्ञानाचे, परिसराचे तोही बसेल नाते जोडत.

अडखळला कुठे तर आहोतच आम्ही After that शक्य झालं तर आजीकडून अंगाई ऐकवा त्याला. मऊशार केसातून हलकेसे हळुवार बोटे फिरवत त्याला गुडूप होऊ द्या त्याला झोपेच्या स्वाधीन.

Study from Home

आमच्या विद्यार्थ्याला तुमच्याकडे सोपवत आहोत.आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्याकडे लवकरच येत आहोत.

आपल्या शाळेने कदाचित सर्वात अगोदर study from home हा उपक्रम चालू केला आहे . therefor त्याला 100% प्रतिसाद द्या.

आम्ही तुमच्यासाठीच आहोत hence तत्पर शाळा आणि विद्यार्थी प्रगतीसाठी आम्ही काम करतोय.

आपल्या पाल्याचे गुरुजी 

Author: Active Guruji

Blogger

2 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.