24 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

24 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- शनिवार, दिनांक- 24/12/2022

मिती- पौष शु.1, शके-1944

सुविचार- निसर्ग जितका कोमल तितकाच क्रूर आहे.

म्हणी व अर्थ-
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.
अर्थ :~ मुर्ख माणसाला कितीही समजावुन सांगितले तरी त्याचे मुर्खतेचे आचरण बदलत नाही.
वाक्प्रचार-
नवल वाटणे- आश्चर्य वाटणे.

आजचा दिनविशेष-

24 डिसेंबर- राष्ट्रीय ग्राहक दिन

राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

  • सुरक्षेचा हक्क
  • माहितीचा हक्क
  • निवड करण्याचा अधिकार
  • म्हणणे मांडण्याचा हक्क
  • तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
  • ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक-

१२९४ – पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.

अठरावे शतक-

१७७७ – जेम्स कुकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.

एकोणिसावे शतक-

१८१४ – घेंटच्या तहाने १८१२ चेयुद्ध संपले.

१८५१ – लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.

१८६५ – अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.

विसावे शतक-

१९१० – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

१९२४ – आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.

१९४१ – दुसरे महायुद्ध – जपानने कुचिंग आणि हॉंगकॉंग जिंकले.

१९४६ – फ्रान्सच्या चौथ्या प्रजासत्ताकाची स्थापना.

१९५१ – लिब्याला इटलीपासून स्वातंत्र्य इद्रीस पहिला राजेपदी.

१९५३ – न्यू झीलंडमध्ये लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.

१९६६ – अमेरिकन सैन्याने भाड्याने घेतलेले कॅनेडेर सी.एल.४४ प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.

१९६८ – अपोलो ८मधील अंतराळ यात्री चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.

१९७९ – एरियान प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.

१९९७ – सिद अल-अंत्री हत्याकांडात ५०-१०० ठार.

१९९९ – काठमांडू येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करून ते विमान अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेले.

एकविसावे शतक-

२००३ – ई.टी.ए.ने माद्रिदमधील चमार्तिन स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.

२०१६ – अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले.

जन्म-

११६६ – जॉन, इंग्लंडचा राजा.

१८४५ – जॉर्ज, ग्रीसचा राजा.

१८६४ – विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.

१८६७ – कांतारो सुझुकी, जपानचा ४२वा पंतप्रधान.

१८६८ – इमॅन्युएल लास्कर, जर्मन बुद्धिबळ खेळाडू.

१८८० – डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.

१८८१ – हुआन रमोन हिमेनेझ, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.

१८९९ – पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.

१९२२ – ॲव्हा गार्डनर, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.

१९२३ – जॉर्ज पॅटन, अमेरिकन सेनापती.

१९२५ – मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.

१९२७ – मेरी हिगिन्स क्लार्क, अमेरिकन लेखक.

१९३४ – स्ट्येपान मेसिच, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९३४ – ताऱ्या हेलोनेन, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.

१९५५ – लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र

१९५७ – हमीद करझाई, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.

१९५९ – अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९६१ – इल्हाम अलियेव, अझरबैजानचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू-

१५२४ – वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.

१८१३ – गो-साकुरामाची, जपानी सम्राट.

१८६३ – विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.

१८७२ – विल्यम जॉन मॅकॉर्न रॅंकिन, ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.

१८७३ – जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.

१९१४ – जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.

१९७३ – पेरियार ई.व्ही. रामसामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते

१९७७ – नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका

१९८० – कार्ल डॉनित्झ, जर्मन दर्यासारंग आणि नाझी जर्मनीचा शेवटचा नेता.

१९८७ – एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री

१९९० – थॉर्ब्यॉन एग्नर, नॉर्वेजियन लेखक.

१९९९ – होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो, ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष.

१९९९ – मॉरिस कूवे दि मुरव्हिल, फ्रांसचा पंतप्रधान.

२००५ – भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका

२००९ – पुरोगामी विचारवंत भा. ल. भोळे

२०१६ – अर्क चित्रकार,रेषांचे जादुगार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे ८९ व्या वर्षी निधन.


राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते. त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.
तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो आणि म्हणतो,’अरे नरेंद्रा’ उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे आणि तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून वीणा वाजवत बसलास.
तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला, ‘अरे मित्रा,” उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो याची नाही.
तात्पर्य-
कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे || धृ ||
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ॥१॥
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे॥ २ ॥
जरी अनेक अपुले धर्म,
जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ॥ ३॥
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!”
– सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

बालगीत –

आपडी थापडी गुळाची पापडी

धम्मक लाडू तेल काढू !

तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान !

चाउ माउ चाउ माउ !

पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप !

गुळाची पापडी हडप !

प्रश्नमंजुषा-

●भारतातील केशरचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
~ जम्मू काश्मिर.
● भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो ?
~ २४ डिसेंबर.
● संजय हे कोणाचे टोपणनाव आहे ?
~ माधव पंढरीनाथ शिखरे.
● भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
~ मोर.

मराठी परिपाठ

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा, परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती
नोट-
वरील सर्व माहिती ही गुगलवरून संकलित केलेली असून काही चुका असतील तर आपण तपासून दुरुस्त करावी.परीपाठ मधील माहिती शैक्षणिक वापरासाठी असून आम्ही कोणतीही मालकी सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.