बीज कविता | bij,1ली ,बालभारती

बीज कविता 

बीज कविता ,कवितेवरील स्वाध्याय

घरचा अभ्यास साठी उपयोगी – बीज स्वाध्याय

प्रश्न- मातीखाली काय रुजते?

उत्तर- मातीखाली इवलसं बीज रुजते.

प्रश्न- बीज रुजल्यावर त्यातून काय बाहेर येते?

उत्तर- बीज रुजल्यावर त्यातून कोंब बाहेर येतो.

प्रश्न- सूर्य कोंबाला काय म्हणेल?

उत्तर- सूर्य कोंबाला माझा हात धर म्हणेल.

प्रश्न- अंगाई कोण गात आहे?

उत्तर- वारा अंगाई गात आहे.

प्रश्न- झाड मोठे झाल्यावर कशाने बहरेल?

उत्तर- झाड मोठे झाल्यावर फुला-फळांनी बहरेल.

प्रश्न- समानार्थी शब्द

१.हात – कर

२.बीज – बी

३.गाणे – गीत

४.वारा – पवन

प्रश्न-कविता तालासुरात म्हणा.
Test …

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.