चुलीवरची खीर
१) पुरीला पाहून कोण हसली?
उत्तर- पुरीला पाहून चुलींवरची खीर हसली.
२) कोण रुसून बसली?
उत्तर- कढईतील पुरी रुसून बसली.
३) झाऱ्याने कोणाला टोचलं?
उत्तर-झाऱ्याने पुरीला टोचलं.
४) युक्ती कोणी केली?
उत्तर- ताईने युक्ती कोणी केली.
५) ‘थंड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर- थंड × गरम
६) वचन बदला.
पुरी – ?
उत्तर- पुरी – पुऱ्या
७) ‘थट्टा’ या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
उत्तर- थट्टा – मस्करी
८) कोणाचे गाल फुगले?
उत्तर-पुरीचे गाल फुगले.
९) चुलीवरची खीर कोणाला हसली?
उत्तर- चुलीवरची खीर पुरीला हसली.
१०) वाटीत बसून कोण आले?
उत्तर-वाटीत बसून खीर आली.